spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पेंढरवाही येथे रेल्वे अंडरपास ब्रीजचे खासदार बर्वे च्या हस्ते भूमिपुजन

– शेतकऱ्यांचा वनवास संपला; सतिश घारड च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

टेकाडी :- मी खासदार म्हणून काम करताना कधीही पक्षीय राजकारण आडवे येऊ दिले नाही. माझ्या पदाचा उपयोग हा केवळ आणि केवळ माझ्या लोकां च्या हितासाठी आणि विकासासाठी व्हावा, हाच माझा एकमेव हेतु आहे , ” असे प्रतिपादन खासदार श्याम कुमार बर्वे यांनी टेकाडी-बोरडा पांदण रोड पेंढरवाही येथील रेल्वे अंडरपास ब्रीजचे भूमिपुजन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

अनेक वर्षांपासुन पेंढरवाही परिसरातील शेत कऱ्यांना शेतात जाण्यासाठी रेल्वे रुळा खालुन अस लेल्या पुलाच्या समस्येचा त्रास सहन करावा लागत होता, विशेषतः पावसाळ्यात या मार्गावर चिखल आणि पाणी साचत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत. रेल्वे पुलाच्या दोन्ही भागाला मोठ्या प्रमाणात शेतकरी शेती करतात पावसाळ्यात या पुलाखालुन जातांना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. हा त्रास ओळखुन ग्राम पंचायत सदस्य सतिश घारड यांनी शेतकऱ्यांच्या संघर्षाला वाचा फोडली आणि सातत्याने पाठपुरावा केला. जानेवारी २०२५ ला निवेदनाद्वारे मागणीचा श्रीगणेशा करण्यात आला, २५ जानेवारी २०२५ रोजी खासदार बर्वे यांच्या पुढाकाराने डीआरएम मध्य रेल्वे यांच्यासोबत तातडीची बैठक बोलावुन १७ फेब्रुवारी २०२५ ला रेल्वे अधिका ऱ्यांकडुन प्रत्यक्ष पेंढरवाही येथे कामाच्या जागेची पाहणी करून कामाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली. ११ जुलै २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या सूचनेनुसार पुलाची रुंदी वाढवण्याचा निर्णय व अंतिम नियोजन आखण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीपासुन ते भूमिपूजना पर्यंतचा प्रवास अत्यंत वेगवान राहिला खासदार बर्वे यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखुन दिलेला शब्द पाळुन मंगळवार (दि.३०) डिसेंबर ला या रेल्वे अंडरपास चे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या हस्ते भुमिपुजन करुन प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपात उतरला असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भूमिपुजन सोहळ्याला तालुकाध्यक्ष दयाराम भोयर, कृ.उ.बा. समिती सभापती सुभाष तडस, ग्रा पं बोरडा उपसरपंच नरेंद्र ठाकरे, टेकाडी ग्र पं सदस्य तारकेश्वरी मोरे, गीता कश्यप, संध्या सिंह, भरत गजबे, सतिश घारड सह बोरडा माजी पोलीस पाटील श्रीराम नांदुरकर, पुंडलिक इंगोले, भगवान यादव, नंदकिशोर निमकर, सुरेश खोरे यांची उपस्थिती होती, याप्रसंगी कार्यक्रमास मारोती हूड, कमलाकर राऊत, नत्थु मोहाडे, अशोक राऊत, विषाधर कांबळे, दिवाकर उमाळे, ज्ञानेश्वर नाक तोडे, गणेश मस्के, राजकुमार वझेकर, प्रज्वल हूड, मनोज लेकुरवाळे, दिलीप मोरे, रमेश बालपांडे, ईश्वर आखरे, डॉ.अनिल नानवटकर, रामकृष्ण हूड, पूनम भोवते, धर्मदास शिंगणे, रामरतन निमकर, देवानंद निमकर, उमेश मोरे, योगराज कांबळे, लेखराज कांबळे , रामभाऊ राऊत, नामदेव कांबळे, रतन कांबळे,सौरव बोरकर, युवराज हूड आदी उपस्थित होते. संचालन सतिश घारड यानी तर आभार रमेश बालपांडे यांनी मानले.

Popular Articles