spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने भव्य समारोह शनिवारी

नागपूर :- न्यू एनर्जी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंत्तीच्या निमित्ताने येत्या शनिवारी ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी 12 वाजता. भव्य समारोह आयोजित केलेला आहे. न्यु एनर्जी बहुउद्देशिय संस्था नागपुर च्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्तर नागपुरातील नागार्जुन प्रगतशिल सभागृह, आंनदनगर येथे सुनिल मेसरे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नागपुर विजया शाह सदस्या बाल कल्याण समिती नागपुर, नम्रता चौधरी सामाजिक कार्यकर्ती, संदिप बुवा वरिष्ठ पोलिस निरिक्षक यशोधरा पोलिस स्टेशन नागपुर या मान्यवरांच्या मुख्य उपस्थितीत व संस्थेच्या कार्यकर्त्या चंदा गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठया प्रमाणात आयोजित आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतील गुणवंत लाभार्थी विद्यार्थाच्या सत्कार समारंभ व परिसरातील कनिष्ठ विद्याालय PMS हायस्कुल, विशाखा हायस्कुल, निकुंज विद्यालय, पंचशिल हायस्कुल, या शाळामधील 8 व वर्ग व 9 व्या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थीनीना शिक्षणाचे महत्व बालकांचे हक्क, या विषयी मार्गदर्शन व बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात येईल. याप्रसंगी महिलांचे सामाजिक आर्थिक मोहिमे अंतर्गत उपस्थितांची शैक्षणिक कार्यात महिलांच्या कल्याणा करिता अग्रेसर असलेल्या नम्रता चौधरी, पुजा झोडे यांचा सत्कार करण्यात येईल. करिता सावित्रीबाई फुले जयंत्ती समारोहात जास्तीत जास्त मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे पत्राद्वारे पुजा झोडे, नैना तामगाडगे, किशोरी ईटनकर, समिक्षा मेश्राम, जयमाला गायकवाड यांनी आवाहन केले आहे.

Popular Articles