नागपूर :- प्रहार मिलिटरी स्कूल, रवी नगर येथे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडले. यंदाच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना “रंगो से भरा भारत” अशी असून भारताने आतापर्यंत केलेली बहुआयामी प्रगती या कार्यक्रमातून प्रभावीपणे सादर करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एअर कमांडोर राजीव भास्कर भडंग (निवृत्त), अर्चना भडंग, ब्रिगेडियर गावपांडे सर,सी.पी अँड बेरार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. अशोक बनसोड, सचिव विजय कागभट, उपाध्यक्ष भालचंद्र कागभट, मिलिंद फडणवीस, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी तसेच संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह व रोप देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. कार्यक्रमात विविध राज्यांची वेशभूषा, लोककला, नृत्य व नाट्य सादरीकरणातून भारताची सांस्कृतिक विविधता दाखवण्यात आली. मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा, गणपती उत्सवाचे महत्त्व, नागपूरचा मानाचा मस्कऱ्या गणपती, राम मंदिर, महाकुंभ, मेट्रो प्रकल्प, चंद्रयान, मंगलयान, उरी सर्जिकल स्ट्राइक तसेच ऑपरेशन सिंदूर यांसारख्या भारताच्या गौरवशाली वाटचालीचे प्रभावी दर्शन घडवण्यात आले. शाळेतील संगीत शिक्षकांनी सादर केलेल्या गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका रीता चौधरी यांनी अतिशय प्रभावीपणे केले, तर वार्षिक स्नेहसंमेलनाची संपूर्ण स्क्रिप्ट शाळेच्या शिक्षिका वैशाली भुसारी यांनी लिहिली. शाळेतील शिक्षक मृणाल काटे आणि धर्मेंद्र पटेल यांनी त्यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रमाला रंगत आणली. अनिरुद्ध मांजरे भाग्यश्री, आलेख यांनी डान्सची कोरिओग्राफी केली. तसेच सौरभ मसराम यांनी संपूर्ण ड्रामा कोरिओग्राफ केला. शंतनु ठेंगडी आणि अंकिता ठेंगडी यांनी व्हॉइसओवर दिला. शाळेतील शिक्षिका आरती शेंडे, प्राजक्ता कुलकर्णी, नेहा कनोजिया यांनी डान्स आणि ड्रामा साठी लागणारे सुंदर असे प्रॉप्स तयार केले. या कार्यक्रमातून भारताच्या प्रगतीची, संस्कृतीची आणि एकतेची सुंदर मेजवानी पालक व उपस्थितांनी अनुभवली. या सगळ्या कार्यक्रमात सर्व शिक्षक व शाळेतील क्रीडा शिक्षकानी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.




