– विद्यार्थिनी संस्कारित व गुणवंत घडावे व सामाजिक कार्यात भाग घ्यावा – जि प सदस्य चतुर्भुज बिसेन
तिरोडा :- विद्यार्थिनी शालेय शिक्षणासोबत संस्कारीक धडा शिकणे व समाजात वावरणे ही एक आज काळाची गरज असून समाजात काम करताना प्रत्येक बाबीची जाणीव असणे हे आपले कर्तव्य असून आज आपण विद्यार्थी असलो तरी उद्याची देशाची भविष्य घडवण्याची जबाबदारी आपली असून उद्याचे आपण नागरिक होणार आपण फक्त संगणकीय ज्ञान न वापरता सामाजिक सांस्कृतिक व गुणवंत विद्यार्थी घडावे जेणेकरून स्पर्धेत टिकते आले पाहिजे कारण की स्पर्धेचे युग आहे स्पर्धे शिवा पर्याय नाही शिक्षण घेऊनच आपण फक्त नोकरीसाठी शिक्षण करणे नाही एक चांगला समाज एक चांगला व्यक्तिमत्व घडविण्यासाठी कार्य करण्याची आपली व समाजाची जबाबदारी जबाबदारी आहे असे मार्गदर्शन जि प कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक सदन संमेलन च्या उद्घाटन प्रसंगी व्यासपटारून जिल्हा परिषद सदस्य चतुर्भुज भिसेन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्नेहसंमेलनाचे व सांस्कृतिक बौद्धिक कार्यक्रमाचे उद्घाटन चतुर्भुज बिसेन जि प सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी उपसभापती व पंचायत समिती सदस्य हुपराज जमईवार, दीप प्रलोजन डॉक्टर चैतलाल भगत पंचायत समिती सदस्य उषा बोपचे सरपंच मनिराम हिंगे उपसरपंच कोमल भगत,सुषमा हिंगे, सविता अंबुले सरपंच, राजू कळव पोलीस पाटील योगेश्वर सूर्यवंशी रमेश बागडे खुशाल कळव, नेहा उपाध्याय,सरिता बोपचे मंजू येरणे, परमेश्वरी साकोरे वाय पी लांजेवार केंद्रप्रमुख सर्व शाळा समिती सदस्य,व्यवस्थापन समिती सदस्य,सखी सावित्री समिती सदस्य,महिला तक्रार निवारण समिती सदस्य, विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा विकास समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य, सर्व शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष चतुर्भुज भिसेन यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण पंचायत समिती सदस माजी उपसभापती हुपराज जमईवार, डॉक्टर चेंतलाल भगत पंचायत समिती सदस्य, नरेंद्र हिंगे उप विभागीय अभियंता, प्रकाश अग्रवाल सामाजिक कार्यकर्ता, कृष्णा फुने केंद्र प्रमुख,, सविता बेदरकर सामाजिक कार्यकर्ता, एम बी सोनेवाणे सेवा निवृत्त प्राध्यापक, कोमल भगत, उषा बोपचे सरपंच सरिता बोपचे मंजू येरणे सर्व शालेय समितीचे सदस ्य व शिक्षक विद्यार्थी पालक माता मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते सविता बेदरकर यांनी शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अब्दुल कलाम वीर सावरकर यांचे विचार प्रकट करावे, शिक्षण फक्त शिक्षण फक्त नोकरीसाठी नाही तर उद्योग राजकारण समाजसेवा व एक चांगले समाज प्रधान प्रबोधनकार, देश सेवेसाठी करावी असे मोलाचे मार्गदर्शन केले तसेच ॲम्बी सोने वाणी यांनी पण मार्गदर्शन केले तसेच नरेंद्र हिंगे ग्रामगीताचार्य यांनी तुकडोजी महाराज यांचे विचार प्रगट करून समाजसेवा देशसेवा समाज कसा घडवता येईल यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एम आर मरकाम यांनी केले संचालन काजल घाडगे व एस एल येडे यांनी केले आभार एल एन पारधी यांनी मांडले स्नेहसंमेलन संयोजक एस एल सिर्फत पि. डी नेताम, डी डी हटवार, आर एम वाघाडे,चोधरी, टी एम ठाकरे, एचएम साकुरे, बी एस बिराजदार, डी एन जनईवार एस बी कळव एस आर गोंधळे उषा कळम रूपाली बाणेवार एपी गौतम जेसी वंजारी व्हीपी सूर्यवंशी सर्व शालेय कर्मचारी शालेय मंत्रिमंडळ यांनी स्नेहसंमेलनासाठी विशेष सहकार्य केले सर्व भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय समिती कडून ट्राफि प्रमाणपत्र देण्यात आले.




