spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माझी माय सावित्री

एक सावित्री पुराणातली

तिने तारले सत्यवानाचे प्राण

तिच्याहूनही ज्ञानाई तू

आमच्यासाठी महान

साथ देऊन ज्योतिबांची

भरला जीवनी आनंद

तुझ्यासाठी ज्योतिबा जणू

कळीतील मकरंद

तू लढलीस म्हणून

जन्मा अमुच्या किंमत आली

झेलून शेण दगड माती

लाख अश्रूंची फुले केली

भुकेल्यांची भाकर झाली

अनाथांची माऊली

पोळल्या लेकी- सुनांस

दिली मायेची सावली

पाठी पोर बांधून

लढली झाशीची राणी

तुझ्या पाठी प्लेग रोगी

अमर तुझी बलिदान कहाणी

दुष्काळाचा डोंब उठला

जनी पाहावे ना दैना

अन्नछत्र चालविले

तू खरी अन्नपूर्णा

थोर तुझे कष्ट आणिक

थोर तुझे उपकार आई

अस्तित्वाचे भान दिले तू

सांग होऊ कशी उतराई

वात्सल्य ही थोर तुझे

जणू वासराची गाय

ज्योती झाला बाप अन्

सावित्री माझी माय

– माला पारधी नागपूर

Popular Articles