नागपूर :- नागपूर महानगरपालिकाद्वारे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि भारतीय तत्त्वज्ञान व संस्कृतीचा जगभर प्रसार करणारे महान तत्ववेत्ते युवकांचे प्रेरणास्थान नरेन्द्रनाथ दत्त उपाख्य ‘स्वामी विवेकानंद’ यांना जयंती दिनानिमित्त (ता.12) विनम्र अभिवादन करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखानी समारंभात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या तैलचित्राला माल्यापर्ण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी, उपायुक्त निर्भय जैन, मंगेश खवले, डॉ. मेघना वासनकर, सहायक आयुक्त श्याम कापसे, डॉ. नरेंद्र बहिरवार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे, प्रमोद हिवसे, प्रकाश खानझोडे, राजेश लोहितकर, गोपाल विश्वकर्मा विनोद डोंगरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी मनपातर्फे अंबाझारी स्थित स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.








