spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारा; पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे निर्देश

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज शासकीय ग्रंथालयाला भेट देऊन पाहणी केली . यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या परिसरात असलेल्या शासकीय अभ्यासिकेला पालकमंत्री म्हणून भोयर यांनी भेट देऊन पाहणी केली व तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुसज्ज अभ्यासिका उभारण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांना दिले.

यावेळी जिल्हाधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन उपस्थित होते.

Popular Articles