spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

व्यक्तिवेध -विजय सोनारघरे विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित’’

नागपूर :- मानवी जिवन जगतांनी अनेकांना काही न काही कार्य समाजासाठी करावे लागते. या अनुषंगाने भारतीय खाद्य निगम अजनी, नागपूर येथुन मॅनेजर (सामान्य, परिचालन) या पदावरून 2016 ला निवृत्त झाले. नंतर त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित होते की आता आपण काय करावे यासाठी त्यांना कार्यालयीन कामाचा 38 वर्षाचा पत्राचा / पत्रव्यवहार करण्याचा दांडगा अनुभव असल्याने स्वतः ला साहीत्य क्षेत्रात अडकविण्याचा त्यांनी एक प्रकारचा छंद बांधला. मागील 10 वर्षात त्यांनी 3 पुस्तके वास्तव, वेचलेली फुले, भावस्पंद-भावस्पर्ष हे स्वतःच्या प्रयत्नाने प्रकाशीत केले असे असतांना सुध्दा त्यांनी गेल्या 10 वर्शात 750 ते 800 आर्टीकल विविध पेपरात प्रकाशीत झालेले आहे. अशा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा विदर्भ फाउंडेशन, नागपूर या संस्थेने शोध घेतला आणि त्यांचा कार्याचा सन्मान करून त्यांना 28 डिसेंबर 2025 रोजी, विदर्भ भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते असे म्हणतात की, प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद यशस्वी जीवनासाठी पूरक ठरत असतो. त्यांनी विविध बाबीवर आतापर्यंत अनेक लेख जसे रोजगार, महिला सबलीकरण, सरकारचे चुकीचे धोरण, पोलीसावर जास्त ताण, जेलमध्ये अधिक कैदी गरीब लोकांसाठी शिक्षणाची अधिक आवश्यकता तसेच 93 लक्ष ईपीएस. पेन्शन धारकासाठी विविध नेत्यांना आणि सरकारकडे आतापर्यंत अंदाजे 190 पत्रे त्यांनी स्वतःच्या खर्चाने पोस्टाने / ईमेल व्दारे पाठविलेले आहे. तसेच नुकतेच आदरणीय राष्टपती दौपदी र्मुमु, भारत सरकार नवी दिल्ली यांना 60 ते 70 पेजेस (बुकलेट) पाठविलेले आहे. जेणेकरून ईपीएस 95 पेन्शन धारकाचे वाढीव पेन्शन चे कार्य होण्यासाठी ते नेहमी तत्पर / प्रयत्नशील असतात. भावस्पर्ष-भावस्पंद या पुस्तकाला नुकतेच बी.आर.गवई, चिफ जस्टीट ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांचेकडून त्यांच्या पुस्तकाला सराहनीय म्हटलेले आहे. ते पत्रातुन असे म्हणतात की, ‘‘पुस्तकाची भाशा ही साधी, स्पश्ट आणि भावपूर्ण आहे. सरकारी सेवक म्हणून मिळालेला अनुभव आणि सामाजिक संवेदनषीलता या दोन्ही गोष्टी लेखनात सुंदरतेने प्रतिबंबीत झाले आहे. अनेक लेखा मधुन आपले चिंतनशिल मन, विचाराची खोली आणि व्यवहारिक दृश्टी दिसते.’’ किंबहुना अषा प्रामाणिक प्रयत्नषील प्रतिभावंत व्यक्तीचा सन्मान होणे हे समाजासाठी आपल्या सर्वांसाठी भुशावह नाही काय ? त्यांच्या विषेश कार्याची दखल घेणे म्हणजे विदर्भ फाउंडेशन यांचे कौतुक करावेसे वाटते. अशा सर्वांगीण साहित्याचा प्रसार व समाजासाठी प्रचार करणारे विजय सिताराम सोनारघरे हे पुस्तकाच्या, वृत्तपत्राच्या माध्यमातुन आपल्या व्यक्तीचा प्रामाणिकपणे प्रचार करतात. त्यांना विद्याभूषण फाउंडेशन, नागपूर व्दारे विदर्भ भुषण पुरस्कार 2025 हा पुरस्कार देवुन डॉ. रमेष ठाकरे, डॉ. प्रदिप आगलावे, नितेश कराडे वर्धा, संचालक डॉ. भुषण भस्मे व पुजा भस्मे या मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले. विजय सोनारघरे म्हणतात की, पुढील नवी उर्जा सर्वांचे जिवन कार्य, सामाजिक बांधीलकी व त्याची मुल्ये प्रभावितपणे विशद करणे व समाजासाठी चांगले काय आहे ते मी अखेरच्या श्वासापर्यंत करत राहील. हेच माझे समाजासाठी ऋणच म्हणावे लागेल. या पुरस्कारातुन त्यांना नवी चेतना / उर्जा, प्रोत्साहन आणि समाजाला भविष्यात काय देवु शकतो या निमित्ताने नेहमी आनंदाचा झरा वाहण्यासाठी मी नेहमी कटीबध्द राहील. या संकल्पने ते नेहमी सकारात्मक असतात. असे असतांना विदया भुषण फाउंडेशन हि संस्था सर्वांना षिक्षण, रोजगार, समान संधी, महिलांचा विकास, पर्यावरण, वृक्षारोपण, गरीब/ गरजूंना, वंचीतांना वेळीच मदत आणि याखेरीज सामाजिक कार्यकर्ताचा विदर्भ भुषण पुरस्कार हे सर्व उपक्रम ही संस्था राबवित असते. हे केवढे मोठे औदार्य म्हणावे लागेल. पुरस्काराचे संपुर्ण श्रेय हे ते निवड समिती तसेच त्यांचे कर्मचारी व महत्वाचे म्हणजे डॉ.भुषण भस्मे व त्यांच्या पुजा भस्मे तसेच फाउंडेशन अधिकारी / कर्मचारी यांना देतात.

Popular Articles