हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज शासकीय ग्रंथालयाला भेट देऊन पाहणी केली . यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या परिसरात असलेल्या शासकीय अभ्यासिकेला पालकमंत्री म्हणून भोयर यांनी भेट देऊन पाहणी केली व तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुसज्ज अभ्यासिका उभारण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांना दिले.
यावेळी जिल्हाधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन उपस्थित होते.




