किशोर साहू, मौदा, ता 16 :- दरवर्षीप्रमाणे यंदाही तीळसंक्रातच्या शुभपर्वावर बाबदेव येथे उद्या ¿ (दि. 16 जानेवारी)पासून दोन दिवसीय मंडईची सुरुवात दुपारी 2 वाजतापासून जंगी कुस्त्यांच्या आमदंगलने होणार आहे. रात्री आठ वाजता भारतीय जनता पार्टी मित्रपरिवार तर्फे अप्सरा डान्स ग्रुप भंडारा यांच्या लावणीच्या कार्यक्रम, शनिवार 17 जानेवारीला सकाळी दहा वाजता पासून सानगडी (साकोली) येथील राष्ट्रीय आजाद पंचशील निशाण शाहिरा सोनू गायधने यांच्या संपूर्ण पार्टी सहित राष्ट्रीय खडा तमाशा, रात्री आठ वाजता युवा मित्रपरिवार तर्फे लावणी व डान्स ग्रुप नागपूर यांच्या लावणीच्या कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे ,सहउद्घाटक माजी आमदार टेकचंद सावरकर ,माजी जि प सदस्या शालिनी शेषराव देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि प सदस्य देवेंद्र गोडबोले, माजी जि प अध्यक्ष सुरेश भोयर ,चेअरमन व्यंकटेश्वरा पावर युनिट दोन बाब देव बबलू गुजर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि प सदस्य तापेश्वर वैद्य ,सामाजिक कार्यकर्ते मनीराम यादव ,माजी पंचायत समिती सदस्य कीर्ती पायतोडे ,तालुका समन्वय समिती अध्यक्ष नरेश मोटधरे, बाजार समिती संचालक राजेश लांडे, नगराध्यक्ष प्रसन्ना (राजा )तिडके ,काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वानखडे, शिवसेना तालुकाप्रमुख नितेश वांगे, माजी सभापती राजेश ठवकर, बाबदेव सरपंचा स्नेहल अनिल वरखडे, उपसरपंच प्रमोद महादुले , सर्व ग्रामपंचायत सदस्यगण सह गावातील, परिसरातील,तालुक्यातील व जिल्ह्यातील मान्यवर धर्मेंद्र येळणे, हेमराज सावरकर ,दिगांबर बांगळकर, अरुण वैद्य, निलेश भोले, बाळकृष्ण खंडाईत, शेषराव देशमुख, आनंद लेंडे ,डिंपल सतीश बावनकुळे, प्रवीण कारेमोरे ,उमेश गायधने उपस्थित राहणार असून या दोन दिवसीय मंडई उत्सवाच्या लाभ घेण्याचे आव्हान तेली समाज पंच कमिटीने अध्यक्ष नरेंद्र सावरकर, उपाध्यक्ष रामचंद्र डांगरे, सचिव प्रशांत डांगरे सह समस्त सदस्यगण व बाबदेव ग्रामवासीयांनी केली आहे.








