किशोर साहू, मौदा, ता. १८ :- श्री गुरुदेव सभागृह चाचेर येथे उद्या रविवार (दि. 18 जानेवारी)ला दुपारी साडेबारा वाजता नवीन वर्ष व मकरसंक्रांत निमित्त हळदी कुंकू व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला भाजपाच्या गावातील ,परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील महिला पदाधिकारी उपस्थित राहणार असून या मेळाव्याचे लाभ घेण्याचे आव्हान कार्यक्रमाचे निमंत्रक माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवून केले आहे.








