-‘रोड सेफ्टी’ मंथ अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- रोड सेफ्टी मंथ २०२६ हा १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, नागपूरचे प्रोजेक्ट डायरेक्टर सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली व ओरिएंटल नागपूर बायपासचे जनरल मॅनेजर प्रशांत बर्गी यांच्या उपस्थितीत खुमारी गावातील पुण्यश्लोक विद्यालयात रोजी रोड सेफ्टी या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित आपले विचार उत्तमरीत्या कोऱ्या कागदावर पेन, पेन्सिल व रंगांच्या सहाय्याने रस्ते सुरक्षिततेविषयीचे आपले विचार प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांनी रेखाटलेली आकर्षक चित्र पाहून कलाकृतींनी उपस्थितांची मने जिंकली. उत्कृष्ट चित्रकला सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यानंतर टोल प्लाझा कर्मचाऱ्यांनी नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व समजावून सांगितले. खुमारी टोल प्लाझाचे टोल व्यवस्थापक अतुल आदमने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रस्ते अपघात टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला पुण्यश्लोक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यादव, शिक्षकवर्ग तसेच टोल शिफ्ट इन्चार्ज आकाश यादव, सिस्टम इंजिनिअर आकाश यादव, कॅशियर योगेश बोन्द्रे, रूट पेट्रोलिंग ऑफिसर त्रिभुवन सिंग, सतीश किरपण, पंकज हांडे, कुंजीलाल तुमडाम, हर्षल वाघाडे, गजानन काटोके आदीनी कार्यक्रमात आवर्जून सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.








