spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पांढरकवडा नगरपरिषद विषय समित्यांची घोषणा, शहराच्या विकासाला नवी दिशा

– कार्यकाळ १ वर्ष, उर्वरित नगरसेवकांनाही मिळणार नेतृत्वाची संधी 

पांढरकवडा :- नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीनंतर सर्वाचे लक्ष विषय समित्यांच्या स्थापनेकडे लागले होते. अखेर सोमवारी दिनांक १९ जानेवारी रोजी ही प्रतीक्षा संपली. नगरपरिषदेच्या सर्व 6 विषय समित्यांचे सभापती, उपसभापती तसेच स्थायी समितीच्या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. नगरपरिषद सभागृहात याबाबत विशेष सभा पार पडली. या सभेचे पीठासीन अधिकारी वणी येथील उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन हिंगोले होते. यावेळी मुख्याधिकारी पंकज गावंडे, नगराध्यक्ष आतिष बोरेले, गटनेते व उपाध्यक्ष अतिश चव्हाण यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत विषय समित्यांच्या सभापतींची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, त्यामुळे नगरपरिषदेच्या प्रशासनिक तसेच विकासात्मक कामांना नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यत्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम समितीची जबाबदारी प्रफुल जिड्डेवार यांच्याकड़े सोपवण्यात आली आहे, तर शहराच्या भविष्यातील विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या नियोजन व विकास समितीचे नेतृत्व पांढरकवडा नगरपरिषदचे माजी उपाध्यक्ष दिवंगत मन्सूर पटेल यांची लेक शैलीना सबरीन खान करणार आहेत. स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी गणेश धुर्वे यांची निवड करण्यात आली असून शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समितीची धुरा सविता गटलेवार सांभाळणार आहेत. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाग्यश्री कडु तर उपसभापतीपदी जयश्री आतिष शेंडे यांची निवड झाली आहे.. शहराची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून उपाध्यक्ष आतिश चव्हाण काम पाहणार असून, त्यामुळ जलपुरवठा व्यवस्थेवर थेट वरिष्ठ नेतृत्वाचे नियंत्रण राहणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.