spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

समर्थ प्राथमिक शाळेत क्रिडा स्पर्धेचे आयोजन

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- शहरातील समर्थ प्राथमिक शाळेत नुकतेच( दि.१५) जानेवारीला दोन दिवसीय शालेय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्रप्रमुख नंदेश्वर व कंगाली तसेच समर्थ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कविता जोंजाळ यांच्या हस्ते दोन दिवसीय क्रिडा स्पर्धेचा थाटात शुभारंभ करण्यात आला. क्रिडा स्पर्धेत सांघिक खेळ व वैयक्तिक खेळ अशा दोन प्रकारच्या खेळांचा समावेश होता. सांघिक खेळामध्ये कब्बडी स्पर्धा, लंगडी स्पर्धा तर वैयक्तिक खेळामध्ये लिंबू चमचा, पोत्याची शर्यत, धावणे, बलुन रेस, एक पायाची शर्यत, रेडी टू स्कूल, बॉल गेम, लांब उडी इत्यादी खेळांचा समावेश होता. या सर्व खेळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच १७ जानेवारी ला ‘ आनंददायी शनिवार ‘ अंतर्गत कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठाचे प्राध्यापक शर्मा सर यांच्या योग प्रशिक्षण दिनाचे आयोजन करून योगा घेण्यात आला. यामध्ये शर्मा सरांनी विद्यार्थ्यांना अनुसरून योगाचे प्रशिक्षण दिले तसेच योगाचे जीवनातील फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

Popular Articles