spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इलाईट पब्लिक स्कूल चाचेर येथे भव्य वार्षिक स्नेहसंमेलन साजरे

किशोर साहू, मौदा, ता. २१ :- रक्षा बहुउद्देशीय शिक्षण संस्था मार्फत इलाईट पब्लिक स्कूल चाचेर येथे भव्य वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुजित टेटे ,शेंडे , शिरसागर , संध्या ढोके व बारसागडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

प्रास्ताविक राष्ट्रपाल गजभिये यांनी केले. प्रमुख पाहुणेंनी मार्गदर्शन पर चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शनपर भाषण केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी लखन वाघमारे , अमोल रामटेके, मिथूल पौणीकर, देवेंद्र पानतावणे, सुनील जांभुळे यांचे सहकार्य लाभले. शाळेतील शिक्षिका भारती नारनवरे, जयश्री भिवगडे, नेहा पाल, शबनम शेख, निकिता कावरे ,नृत्य शिक्षिका ढोमणे यांनी परिश्रम घेतले. दुर्गाप्रेम बहुउद्देशीय संस्थाचे सचिव गुप्तपाल गजभिये यांचे विशेष सहकार्य लाभले.

Popular Articles