कन्हान :- कन्हान पोलीस हे पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलींग करीत असता गुप्त बातमीदारा कडुन माहीती प्राप्त झाली की, नागपूर जिल्हयातुन तिन महीन्या करीता हददपार करण्यात आलेला इसम नामे शुभम राजेश सोमकुंवर, वय २४ वर्ष, रा. सिहोरा, कन्हान हा त्याचे घरी हजर आहे. मिळालेल्या माहीतीवरून पोलीसंनी तात्काळ त्याचे घरी जावुन तपासणी केली असात हद्दपार इसम घरी हजर मिळुन आला. त्याची विचारपुस केली असता त्याने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नागपूर जिल्हयात प्रवेश करून हद्दपार आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपीवर कलम १४२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.








