कन्हान :- कन्हान पोलीसांनी पिपरी रामनगर येथील गाडेघाट रोड येथे आरोपी अक्षय जयराम कोरवते, वय ३० वर्ष, रा. वार्ड क्र. ०७, रामनगर, पिपरी, कन्हान ता. पारशिवनी हा नायलॉन मांजानी पतंग उडवित असल्याने त्याचे वर कारवाई करत गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच मा उच्च न्यायालयाच्या दिनांक १२/०१/२०२६ च्या आदेशान्वये पोलीसांनी वर नमुद आरोपी याला २५,०००/- रूपये दंड भरणेबाबत नोटीस बजावलेली होती. सदर कारवाईचा अहवाल कन्हान पोलीसांनी महसुल विभागाकडे पाठविला असता आज दिनांक २०/०१/२०२६ रोजी नमुद आरोपीकडुन दंडाची रक्कम २५,०००/- रूपये वसुल करण्यात आली आहे. मा उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नमुद दंडाची रक्कम शासकीय खजिना दाखल करण्यात आली आहे.








