किशोर साहू, मौदा ,ता.२२ :- मौदा तालुक्यातील सीमेलगत कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निलज येथील जिओच्या टावरची रेंज मशीन चार दिवसापूर्वी चोरी गेल्याने व ती अजूनही न बसविल्याने मोबाईलला व्यवस्थित कव्हरेज मिळत नसल्याचे निलज येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर चकोले यांनी सांगितले. त्यामुळे जिओचे सिमधारक ग्राहक भास्कर चकोले सह इतरही ग्राहक कमालीचे त्रस्त आहेत.
आजच्या या मोबाईलच्या युगात अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाप्रमाणे मोबाईल, इंटरनेट व रेंज याही मूलभूत गरजा बनलेले आहेत. याशिवाय नागरिकांना त्यांचे कोणतेही दैनंदिन कामे करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे निलज येथील जिओच्या टावर ची चोरी गेलेली रेंज मशीन लवकरात लवकर बसून टावर चे रेंज सुरळीत करण्याची मागणी निलज येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर चकोले, सुशांत चकोले, गुंडू पाहुणे ,प्रणय पाहुणे, मुकेश भुते, बापूराव भुते, अनिल पाहुणे सह समस्त ग्रामवासी व परिसरातील त्रस्त नागरिकांनी संबंधित विभागाकडे केली आहे.








