spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

परमात्मा एक सेवक यात्रेसाठी विशेष गाडया

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत २६ जानेवारी २०२६ रोजी मौदा येथे होणाऱ्या परमात्मा एक सेवक यात्रेकरीता भंडारा जिल्हातील भंडारा बसस्थानक, साकोली बसस्थानक, तुमसर बसस्थानक व पवनी बसस्थानक येथून भाविक भक्तांकरीता विशेष गाडया सोडण्यात येत आहेत. तसेच विभागामार्फत चालविण्यात येत असलेले सर्व लांब व मध्यम लांब पल्ला नियते, निमआराम, शिवशाही व शिवाई वाहनास मौदा यात्रा कालावधीत मौदा बायपास येथे थांबा देण्यात आलेला आहे.

तरी भंडारा जिल्ह्यातील भाविक भक्तांनी यात्रा कालावधीत राज्य परिवहन बसेसचा लाभा घ्यावा,असे नियंत्रक, राज्य परिवहन भंडारा तनुजा अहिरकर यांनी कळविले आहे.

Popular Articles