spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

– प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये

यवतमाळ :- स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक व महाराष्ट्र दिन राज्यभर साजरा करण्यात येतात. यावेळी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान व्हावा हे प्रत्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्लॅस्टीक ध्वजाचा वापर करु नये.

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजाण व जागरुक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याबाबत काळजी घ्यावी तसेच विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करु नये. प्लॅस्टीकचे ध्वज आढळुन आल्यास संबंधित तहसिलदार किंवा नगरपालिका कार्यालयात असे ध्वज जमा करावेत. तसेच 26 जानेवारी या कार्यक्रमा प्रसंगी जिल्ह्यातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Popular Articles