– २५ ते २६ जानेवारी दरम्यान दोन दिवसीय कार्यक्रम
खापा :- सावनेर तालुक्यातील खापा येथील वीरशैव लिंगायत समाज मठ संस्थान, खापा तर्फे २५ ते २६ जानेवारीला मठाचे वास्तुपुजन व मुर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि गुरुदिक्षा असा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम विरशैव लिंगायत मठ, माळीपूरा, खापा येथे होणार असून जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहेत.
दरम्यान रविवार दि. २५जानेवारीला सकाळी ९.०० वाजता श्री शंख प्रतिष्ठा व मिरवणूक यानंतर सकाळी १० वाजता मठाचे वास्तुपुजन, यानंतर सकाळी ११ ते दुपारी २ वाजता पर्यंत श्री गणेश व श्री बसवेश्वर महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. दुपारी २ ते ५ वाजता पर्यंत ष. ब्र. १०८ सद्गुरु श्री सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज व श्री ष. ब्र. १०८ श्री शिवशंकर शिवाचार्य महाराज यांचे आर्शिवचन होणार आहे. यानंतर सायं. ५ ते ९ स्नेहभोजन होणार आहे. यानंतर सोमवार दि. २६ जानेवारीला सकाळी १०.०० वाजता विरशैव लिंगायत मठ संस्थान, खापा येथे ष. ब्र. १०८ सद्गुरु श्री सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा मठ संस्थान, जि. बुलढाणा यांचा गुरूदिक्षा कार्यक्रम होणार आहे. तरी सदर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी भाविकांनी लाभ घ्यावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आलेले आहे.




