spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शिवशक्ती नगरात श्रीराम जन्मोत्सवचा दुसरा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

नागपूर :- दक्षिण नागपुरातील मानेवाडा रिंग रोड येथील श्री हनुमान सेवा पंच कमेटी शिवशक्ती नगर नंबर २ व ३ च्यावतीने हनुमान सेवा पंचकमेटी तर्फे श्रीराम दरबार व विठ्ठल रूख्मिणी मूर्ती वर्धापनदिन द्वितीय वर्षपूर्ती सोहळा नुकताच थाटामाटात साजरा करण्यात आला. वर्धापनदिन कार्यक्रम गुरुवारी २२ जानेवारीला मूर्तीची पुजा अभिषेक व महाआरती तसेच सुन्दरकांड सह भजनाचा आनंद घेण्यात आला. त्यानंतर दुपारी बाईक रॅलीत वस्तीतील नागरिक सहभागी झाले होते. याप्रसंगी दक्षिण नागपूरातील प्रभाग 34 मधले भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले उमेदवार बाबाराव तायडे, नागेश मानकर, सौ. मंगलाताई खेकरे आणि मनीषा नगरधनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. शिवशक्ती नगर हनुमानाच्या मंदिरातून बाईक रॅलीला सुरुवात झाली आणि संपूर्ण एरियामधून वाजत गाजत आनंदाने रॅली निघून मंदिरात पोहोचली. कारण श्रीराम जन्मोत्सवाचे हे दुसरं वर्ष आहेत. या रॅलीमध्ये कमीत कमी शेकडो लोकांनी सहभाग घेतला होता. यावेळी भाजपचे श्री संजय ठाकरे, प्रदिप गणोरकर, हेंमत वाघाडे, पराग धर्माधिकरी, व राजेश वाघाडे तसेच आकाश वाघाडे यांच्यासह उपस्थित होते.

Popular Articles