spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आत्मिक कलेचे सादरीकरणाने विद्यार्थ्यांनी जिंकली मने

– राज्यमंत्री सह नवनियुक्त नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवकांची उपस्थिती 

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- विशेषत: सांस्कृतिक कार्यक्रमातले नृत्यांगण, ज्यात सुंदर लावणी, भोपा, काहिला, औद्योगिक कला, विभिन्न भाषांतर कलेचे प्रस्तुतिकरण करून प्रेक्षकांची जिंकली मने. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते अशा कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांना स्वतःमधील कला आत्मविश्वास आणि सर्जनशीलता व्यक्त करण्याची संधी मिळण्यासाठी शुक्रवार (दि.२३) ला समर्थ विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसाद किंमतकर यांच्या अध्यक्षतेत राज्यमंत्री आशिष जयस्वाल हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी सचिव ऋषिकेश किंमतकर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन उपाध्यक्ष आलोक मानकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. दरम्यान राज्यमंत्री आशिष जयस्वाल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपाध्यक्ष तथा नगरसेवक, नगरसेविका व पत्रकार मंडळी यांच्या स्वागत सत्कार करण्यात आला. मंडळाचे सचिव ऋषिकेश किंमतकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर केले. विविध पारंपरिक नृत्य, देशभक्तीवर गीते आणि नाटकांच्या सादरीकरणाने उपस्थित पालकांची व प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्याच्या प्रदर्शनावर टाळ्यांच्या गडगडात झाला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका भाग्यश्री ढोरे तथा दिपाली वांद्रे यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षक प्रवीण चकोले यांनी केले.

तब्बल पंधरा दिवसांपासून तयारी

शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आहे व त्यात भाग घ्यायचा आहे. तेव्हा विद्यार्थ्यांना फार मोठी उत्सुकता, कार्यक्रमात सहभाग नोंदविलेले विद्यार्थी जवळपास पंधरा दिवसांपासून तयारीला लागलेले होते. सामूहिकरित्या सराव करणे व सराव वारंवार करणे यात ते गेल्या काही दिवसांपासून मग्न होते. आज पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे अचूक कला कौशल्य पाहून उपस्थित असलेले सर्वच भारावून गेल्याचे चित्र दिसुन आले.

Popular Articles