spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अजित पवार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

आज महाराष्ट्रावर दु:खाच डोंगर कोसळलाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा दुर्देवी विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती विमानतळाजवळ सकाळी पावणेनऊच्या सुमारास अजित पवार यांचं विमान लँडिंग करताना कोसळलं. अजित पवारांसोबत या विमानात सहाजण होते. या अपघातात सर्वांचा मृत्यू झालाय. अजित पवार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट केलीय.

अजित पवार हे लोक नेते होते. तळागाळातील जनतेशी त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यांच्याविषयी जनतेमध्ये प्रचंड आदराची भावना होती. ते मेहनती होते. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी ते सदैव पुढे असायचे. त्यांना प्रशासकीय विषयांची उत्तम समज होती. समाजातील गरीब आणि पिचलेल्या घटकांसाठी ते खूप आत्मीयतेने, तन्मयतेने काम करायचे. ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे. त्यांचं अकाली निधन ही खूप धक्कादायक आणि दु:खद बातमी आहे. त्यांचे असंख्य पाठिराखे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ओम शांती” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांच्या निधनानंतर एक्सवर ही पोस्ट केलीय.

Popular Articles