spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अजितदादांच्या निधनाने जनसामान्यांचा आधार हरपला; खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

भंडारा :- महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनाची बातमी मनाला खूप वेदना देणारी आहे. हा अपघात संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे.

अजितदादा पवार यांनी आपल्या आयुष्यात कायम जनतेसाठी काम केले. शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी ते नेहमी पुढे राहत होते. विकासकामांबाबत त्यांचा दृष्टिकोन आणि वेगळी कार्यशैली सर्वांना परिचित होती.

या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली.

Popular Articles