spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका; भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेतृत्व अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात झालेले निधन ही वार्ता संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरली आहे. जनसेवेचा वसा घेतलेले, प्रशासनावर मजबूत पकड असलेले आणि सर्वसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे नेतृत्व गमावल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर, आज भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करून लाडक्या नेत्याला अश्रूपूर्ण निरोप देण्यात आला.

यावेळी जिल्हा कार्यालयात आयोजित सभेत स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून ईश्वर मृतात्म्यास शांती देवो, अशी प्रार्थना केली. यावेळी नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अजितदादांचे जाणे ही केवळ एका पक्षाची नव्हे, तर संपूर्ण राज्याची कधीही भरून न निघणारी हानी आहे. त्यांच्या कार्यशिस्तीचा आणि विकासाच्या ध्यासाचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते:

या श्रद्धांजली सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, आमदार राजु कारेमोरे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, प्रा. माधुरी पालीवाल, योगेश हेडाऊ, हेमंत महाकाळकर, शेखर (बाळाभाऊ) गभने, डॉ. जगदिश निंबार्ते, डॉ. रविंद्र वानखेडे, डॉ. श्रीकांत वैरागडे, यशवंत सोनकुसरे, आरजु मेश्राम, हितेश सेलोकर, सुमित शामकुंवर, राजु पटेल, डॉ. सचिन बावनकर, सदाशिव ढेंगे, महेंद्र वाहाने, मंजुषा बुरडे, सुषमा साखरकर, किर्ती गणविर, लोकेश खोब्रागडे, नारायणसिंग राजपूत, आनंद मलेवार, रजनिश बन्सोड, उत्तम कळपते, दयानंद नखाते, रत्नमाला चेटूले, अॅड. नेहा शेंडे, डॉ. अनिता महाजन, मनिष वासनिक, रुपेश टांगले, चंद्रकांत कोहाड, अरुण भेदे, कपील जैन, अमन मेश्राम, सुनिला उपरिकर, हर्षिला कराडे, छाया गभणे, निशा राऊत, वंदना तुरस्कर, राजश्री राखडे, किर्ती कुंभरे, सारिका नागदेवे, क्रिष्णा उपरीकर, ईश्वर कळंबे, राजु बावनकुळे, राजु शक्तीकर, राजेंद्र राखडे, संजय सतदेवे, सुनिल मोगरे, अरुण अंबादे, साहिल हुमणे, लोकेश नगरे, भोजराज वाघमारे, प्रेमसागर गजभिये, फरहान पटेल, विशाल बावनकुळे, अज्ञान राघोर्ते, राजु लुटे, रुपेश खवास, सुभाष तितीरमारे, निरज शहारे, प्रदीप सुखदेवे, सुनिल भोपे, रवि लक्षणे, किरण पवनकर, सुरेश थोटे, विष्णु कढीखाये, रविंद्र पवनकर, राजेश वासनिक, विद्या साखरे, नरेंद्र साखरकर, सुधिर वहिले, अबरार अहमद, प्रकाश भुरे, लक्ष्मीकांत गभणे यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles