spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पाटणसावंगी नगरपंचायत मुद्यावरून ग्रामसभेत गदारोळ; २ फेब्रुवारीला विशेष ग्रामसभा

खापा :- प्रजासत्ताक दिनी पार पडलेल्या ग्रामसभेत पाटणसावंगी गावाला नगरपंचायतचा दर्जा मिळू नये असा अर्ज समोर आला. हा विषय सभेत येताच दोन पक्षात गदारोळ झाला. ११ फेब्रुवारी २०२५ ला झालेल्या ग्रामसभेत अनेकांनी नगरपंचायत होण्यासाठी सहमती दर्शवत ठराव पास केला होता. येथील सत्ताधारी नागरिकांनी नगरपंचायत होण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवत ग्रामपंचायतीचेच अस्तित्व टिकवून ठेवावे अशी मागणी लावून धरली. या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यामुळे ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाला.

ग्रामस्थांनी कर वाढण्याची भीती व्यक्त करत नगरपंचायती ऐवजी ग्रामपंचायत कायम ठेवण्याची भूमिका मांडली होती, पण कर थोडेफार वाढत असून त्याच्या तुलनेत शहराचा विकास होईल नगराची वेगळी ओळख होईल असा विषय सभेत अनेकांनी मांडला. नगरपंचायतीमुळे गावाचा विकास जलद होईल असे समर्थकांचे म्हणणे होते, मात्र विरोधकांनी गावपण हरवण्याची भीती व्यक्त केली.

शेवटी ग्रामविकास अधिकारी, सरपंच व इतर ग्रामस्थांनी विषय थांबवत गावातील अनेक नागरिकांना नगरपंचायतचा विषय समजावा व त्यावर सखोल चर्चा व्हावी या हेतूने सोमवारी २ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी चौकात विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे. गावातील अनेक व्यावसायिक प्रतिष्ठांनावर चुकीच्या पद्धतीने कमी कर घेण्यात येत असल्याचा विषय समोर आला त्यानंतर काही सभासदांनी कर नोंद वही तपासणीची मागणी केली. नोंदवही तपासल्यावर समजले की त्यात खूप घोळ आहे. कर आकारणीची चौकशी व्हावी असे पत्र ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आले. २ फेब्रुवारीला नगर पंचायतच्या विशेष ग्रामसभेत काय ठरते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या ग्रामसभेत शेकडो ग्रामस्थांनी हजेरी लावली.

Popular Articles