spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“प्रशासनाचा ‘दादा’ हरपला; भंडारा जिल्हा भाजपातर्फे अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली”

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांचे नेते अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, एका कर्तृत्ववान नेतृत्वाचा अंत झाला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्ह्याच्या वतीने आज शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सर्व उपस्थितांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अजितदादा पवार हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर प्रशासनावर मजबूत पकड असलेला आणि कामाचा अफाट वेग लाभलेला एक लोकप्रतिनिधी होते. लोककल्याणाचा ध्यास घेऊन राज्याच्या विकासासाठी ते अखंडपणे झटत राहिले. त्यांच्या धाडसी निर्णयामुळे आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे त्यांनी जनमानसात आपले अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

भंडारा येथील भाजप कार्यालयात आयोजित या शोकसभेला भाजप जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने, जिल्हा महामंत्री मयुर बिसेन, भंडारा शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर आणि भंडारा नगर परिषद अध्यक्ष मधुरा मदनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी चंद्रकला भोपे, रुबी चड्ढा, संदीप मेश्राम, हरिचंद मडावी, प्रीती ब्राह्मणकर, श्रद्धा डोंगरे, रोशनी पडोळे, भाग्यश्री कळंबे, निलेश गाढवे, प्रदीप साठवणे, रवींद्र नेवारे, शैलेश मेश्राम, पप्पू भोपे, अक्षय भिवगडे, निमिष डोकरीमारे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन केले. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.

Popular Articles