spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वायगाव येथे आज श्री हनुमान प्राणप्रतिष्ठा महोत्सव व उद्यापासून संगीतमय श्रीमद् भागवत कथेला सुरुवात 

किशोर साहू, मौदा, ता. 30 :– दरवर्षीप्रमाणे यंदाही गट ग्रामपंचायत सिरसोली अंतर्गत येत असलेल्या वायगाव येथे हनुमान देवस्थान पंचकमिटीचे सदस्यगण व समस्त गावकरी मंडळी तर्फेआज शुक्रवार (दि. 30 जानेवारी) दुपारी तीन वाजता पासून कलश यात्रा, ग्रंथपूजन, देवाची प्राणप्रतिष्ठा, ग्रामदेवता पूजन.

31 जानेवारीला कथावाचक श्रद्धेय पंडित नंदकिशोर मिश्रा, प्रफुल कुमार यांच्या वाणीने संगीतमय श्रीमद् भागवत सप्ताहाला सुरुवात होणार आहे.सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत कथा श्रीकृष्ण वर्णन, भागवत वर्णन, सुखदेव परिचित संवाद. एक फेब्रुवारीला ध्रुवचरित्र, प्रल्हाद चरित्र, जडभरत आणि वामन अवतार कथा वर्णन. दोन फेब्रुवारीला श्रीराम कथा वर्णन आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव बधाई उत्सव. 3 फेब्रुवारीला श्रीकृष्ण बाललीला, वृंदावन लीला, गोवर्धन पूजन व 56 भोग, 4 फेब्रुवारीला मथुरा गमन, कंस वध, रुक्मिणी विवाह. 5 फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता भ्रमण देव पूजन, पालखी सोहळा, सायंकाळी सात वाजता भगवान श्रीकृष्ण विवाह, भूमासुर वध, सुदामा चरित्र, परिचित मोक्ष, तुलसीवर्षा कथा विश्राम, रात्री जागृती. 6 फेब्रुवारीला सकाळी सात वाजता हनुमान अभिषेक, शिवप्रतिष्ठा ,सकाळी अकरा वाजता पासून हवन, दहीकाला व महाप्रसादाने समारोप होणार आहे. तरी या संगीतमय भागवत कथेचा लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Popular Articles