spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बोरगांव बुज येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

हंसराज, प्रतिनिधी भंडारा बोरगाव :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनसामान्याचे नेते अजितदादा पवारांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८:४५ ला घडली.त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली असून या पाश्र्वभूमीवर बोरगांव बुज येथे गुरुवारी सायंकाळी ७ वाजता श्रद्धांजलीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी केलेल्या कार्यावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला. प्रशासनावर मजबूत पकड, जलद निर्णयक्षमता, सहकार व पायाभूत सुविधा विकासातील योगदान याबाबत वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी बोरगांव ग्रामपंचायतीचे सरपंच संजय लांजेवार, पोलिस पाटील जगदीश लांजेवार, ग्रामपंचायत सदस्य अमोल खोब्रागडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुषार बावनकुळे, माजी सरपंच राजकुमार हटवार, लंकेश्वर हटवार, मधुकर हटवार, चतुराम लांजेवार, शैलेश उरकुडे, अरुण बावनकुळे, वेदान्त हुमणे, रामराव कारेमोरे, फिरंद हुमणे, संजय गोंडाने, प्रमोद खोब्रागडे, सुनील वरणकर यांच्यासह ग्रामवासी या श्रद्धांजली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles