spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विभागीय आयुक्त कार्यालयात हुतात्म्यांना श्रद्धांजली

नागपूर :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयात सर्व कामे व हालचाल बंद ठेवून दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आणि इमारत परिसरात आयोजित कार्यक्रमात प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार, पुनर्वसन सहआयुक्त विजया बनकर, नियोजन उपायुक्त अनिल गोतमारे, मागासवर्ग कक्षाच्या उपायुक्त डॉ. हंसा मोहने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles