spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

त्या बैठकांचा मीही साक्षीदार, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर माजी मंत्र्याचा मोठा दावा, फडणवीस यांचा दावा खोडला?

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावर राजकीय वादळ उठले आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादांनी विलीनीकरण मान्य केल्याचा दावा केला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो फेटाळून लावला. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेनेही चर्चांना उधाण आले आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे.

गेल्या आठवड्यात (28 जानेवारी) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान अपघातात आकस्मिक निधन झालं. गुरूवारी (29 जानेवारी) बारामतीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले तर दोनच दिवसांनी 31 तारखेला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट – अजित पवार गट) विलीनीकरणाची चर्रा सुरू होती, ती अंतिम टप्प्यात होती. 12 तारखेला यासंदर्भात घोषणा करण्यात येणार होती असं शरद पवार (Sharad Pawar) पत्रकार परिषदेत म्हणाले होत. पवार गटाच्या अनेक नेत्यांनीही विलीनीकरणाच्या चर्चेबाबत पुष्टी केली होती. मात्र अजित पवार यांच्यानंतर या चर्चेत खंड पडला आहे. त्यांच्या गटाने तर विलीनीकरणाबाबत भाष्य करण्यास नकार दिलाय.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य करत विलीनीकरणाच्या चर्चेचा दावा खोडून काढला आहे. अजितदादा प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर करत होते, सर्व गोष्टींचा मी साक्षीदार आहे. आम्हाला या गोष्टीत राजकारण करायचं नाही, मात्र जर अजितदादा असा कोणता निर्णय घेणार असतील तर त्यांनी आधी भाजपसोबत चर्चा केली असती असं म्हणत त्यांनी विलीनीकरणाचा दावा फेटाळू लावला.

या मुद्यावरून राजकारण तापलेलं असतानाच आता राष्ट्रावादी काँग्रेसच्या एका नेत्याने मोठा दावा केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी, अशी खालपासून वरपर्यंतच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यानुसार. प्रामुख्याने चर्चा झाली होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केला आहे. काही चर्चांत मीसुद्ध साक्षीदार आहे, असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे फडणवीसांनी केलेला दावा त्यांनी एकाप्रकारे फेटाळून लावला आहे.

दादांनी सुद्धा या विकिनीकरणाला मान्यता दिली होती – शिंगणेंचा दावा

बुलढाणा येथे बोलोाना डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांबाबत हा दावा करत भाष्य केलं. ” मागील दोन तीन महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी, अशी वरपासून खालपर्यंत कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छा होती, त्यानुसार प्रामुख्याने चर्चा सुद्धा झाली आहे . काही चर्चांमध्ये मीसुद्धा साक्षीदार आहे. अजित दादांनीसुद्धा या विकिनीकरणाला मान्यता दिली होती, असं शिंगणे म्हणाले. ” ” जयंत पाटील यांच्या पुढाकाराने काही जण प्रयत्न करत होते . पवार साहेबांनी सुद्धा सांगितले आहे की येत्या 12 तारखेला दादा घोषणा करणार होते . आजही सर्वाची इच्छा आहे की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन एकाच झेंड्याखाली सगळ्यांनी काम करावं ” असं शिंगणे यांनी नमूद केलं.

शनिवारी (31 जानेवारी) मुंबई लोकभवनात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याच दिवशी सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबात आपल्याला कल्पना नाही, असं ते म्हणाले होते. तसेच ते य़ा शपथविधीसाठी मुंबईलाही उपस्थित नव्हते. या मुद्यावरंही शिंगणे बोलले. शरद पवारांना शपथविधीचे निमंत्रण नव्हतं, त्यासंदर्भात मला काही माहिती नाही . मात्र ती (उपमुख्यमंत्रीपदाची) जागा लवकरात लवकर भरली जावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असावा . सुनेत्रा ताईंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ द्यावी अशी आमदार खासदारांची इच्छा होती. त्यातून तो निर्णय झाला असावा असं शिंगणे म्हणाले.

अपघाताचं राजकारण नको

जयंत पाटील यांनी विमान दुर्घटनेसंदर्भात शंका व्यक्त केली होती. मात्र शरद पवार साहेबांनी सुद्धा सांगितले आहे की हा अपघात होता, यात कुणीही राजकारण करू नये . मात्र मुख्यमंत्रानी सुद्धा सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत त्यातून सत्य काय ते बाहेर येईल असं शिंगणे यांनी नमूद केलं.

Popular Articles