spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रघुराम राजन यांचा भारताला धोक्याचा इशारा, म्हणाले, जग अत्यंत…

– रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी जगाच्या सध्याच्या परिस्थितीवर भारताला अत्यंत मोठा इशारा दिला. रघुराम राजन यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर टेन्शन अधिकच वाढल्याचे बघायला मिळत आहे.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकताच भारताला मोठा धोक्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने हा टॅरिफ लावण्यात आला होता. भारताने आता पूर्णपणे रशियाकडून तेल खरेदी बंद केली. मात्र, असे असतानाही अमेरिकेने टॅरिफ कमी केला नाही. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताने थेट अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले. मात्र, यावेळी भारताला मोठी कसरत करावी लागत आहे. तसा अमेरिकेच्या टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम पडला नाही. मात्र, बदललेल्या समीकरणांमुळे फटका बसण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानसोबतच भारताचे बांगलादेशासोबतचही संबंध तणावात आहेत. चीनसोबतचे संबंध बऱ्यापैकी सुधारले आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीमध्ये चीनवर विश्वास ठेवणे घातक आहे. रघुराम राजन यांनी यासर्व परिस्थितीवर मोठा इशारा दिला. रघुराम राजन यांनी म्हटले की, सध्या जग एका कठीण काळातून जात आहे. भारताने यादरम्यान काही चुका करणे टाळावे.

आज बघायला गेले तर प्रत्येक शहराला मेट्रोची आवश्यकता आहे पण खरोखरच तिथे मेट्रो चालवण्याची क्षमता आहे का? हे पाहणेही महत्वाचे आहे. रघुराम राजन यांनी पुढे म्हटले की, श्रीलंका, बांग्लादेश आणि नेपाळसोबत आपण संबंध चांगली ठेवायला हवीत. भारताला या देशांची आर्थिक दृष्ट्या नक्कीच गरज आहे. मुळात म्हणजे सध्याच्या परिस्थितीला AI गुंतवणूक करताना फार विचार करणे आवश्यक आहे.

अमेरिका सतत भारतावर विविध प्रकारचे निर्बंध लादताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असल्याचा दावा सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जातो. अमेरिका भारतावर दबाव आणत असतानाच रशियाचे अध्यक्ष पुतिन आपल्या काही मंत्र्यांसोबत भारत दाैऱ्यावर आले आणि त्यांनी थेट महत्वाचे करार भारतासोबत केले. भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू होती. पण शेवटपर्यंत करार हे होऊ शकले नाहीत. कोणत्याही परिस्थिती अमेरिकेला भारतासोबत व्यापार करार करायचे आहेत.

Popular Articles