spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘मेरा युवा भारत’ आणि ‘सीनियर सिटीजन होम’तर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

– ज्येष्ठांचा सन्मान, आरोग्य जनजागृती आणि फळवाटप उपक्रम; जिल्हा युवा अधिकारी सुशील भड यांचे मार्गदर्शन

हंसराज, भंडारा :- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय  (भारत सरकार) अंतर्गत कार्यरत ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat), भंडारा आणि भारतीय औषधी अनुसंधान संस्था द्वारा संचालित ‘सीनियर सिटीजन होम फॉर एल्डर वूमन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष जनजागृती व सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे ५० ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा युवा अधिकारी सुशील भड उपस्थित होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांच्या आरोग्याची व दैनंदिन गरजांची विचारपूस केली. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, “ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा अनमोल ठेवा आहेत. त्यांचा योग्य सन्मान राखणे, त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवणे आणि त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळवून देणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.” तसेच केंद्र व राज्य शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना आणि सुविधांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमादरम्यान सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले तसेच त्यांच्या आरोग्यासाठी पौष्टिक फळांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय औषधी अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. रवींद्र वानखेडे, डॉ. ज्योती वानखेडे, डॉ. अश्विनी लांडगे, ऑफिस असिस्टंट अतुल गेडाम, जितसिंग लिल्हारे यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि युवा स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Popular Articles