– विविध सामाजिक उपक्रमांद्वारे दिला समर्पण व सामाजिक बांधिलकीचा संदेश
हंसराज,भंडारा :- भारतीय जनता युवा मोर्चा, भंडारा जिल्ह्याच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित ‘वडनगर ते वाराणसी बाईक सेवा यात्रा’ दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडली. दोन दिवसीय दौऱ्यात यात्रेचे विविध ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले असून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
यात्रेदरम्यान रोंघा जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. तसेच देवनारा, डोंगरी, लोभी, आष्टी, नाकाडोंगरी मार्गे यात्रेने बालाघाट दिशेने मार्गक्रमण केले. दुसऱ्या टप्प्यात खरबी नाका, जवाहरनगर व भंडारा येथे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि ‘युवा नशामुक्ती संवाद’ घेण्यात आला.
दि. २८ रोजी सेंट पॉल स्कूलमध्ये वृक्षारोपण, त्रिमूर्ती चौक येथे स्वागत, लाखनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप आणि साकोलीत स्वागत करून शेंदूरवाफामार्गे यात्रा गोंदिया जिल्ह्याकडे रवाना झाली. या यात्रेद्वारे समाजात सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश देण्यात आला.
या सेवा संकल्प अभियानाच्या यशस्वीतेसाठी भाजप जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे, नगराध्यक्ष मथुरा मदनकर, सचिन कुंभलकर भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन बोपचे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माहेश्वरी नेवारे, तिलक वैद्य, भाजयुमो जिल्हा महामंत्री महेंद्र गभने, दीपक हिवरे, तुलसीदास बुरडे, विश्वनाथ बांडेबुचे, धर्मेंद्र कटरे, अरुण बोपचे, रूपेश दुरूगकर, अतूल गेडाम, रूपराज सोनवणे, अरविंद पटले, सतीश सोनवणे, दीपक घोडीचोर, तुषार हट्टेवार, अक्षय भिवगडे, गुलशन कोरे, यश ठाकरे, विपुल पराते, आकाश फाले, प्रशांत पुरुषार्थी, हर्षल टांगले, रोहित नागपुरे, वृशभ सुदामे, आदित्य बांते, अश्विन धरमसारे, अभिषेक गिरीपुंजे, गणेश हत्तीमारे, सुमीत मेघराजानी, योगेश तितरमारे, मोहित रणदिवे, सचिन कुथे, संदीप भांडारकर, धनंजय घाटबांधे, महेश आकरे, देवा बोरकर, नितेकेश राऊत, व्यंकटेश येवले, किशोर पोगळे, मनीष कापगते, सपन कापगते, उपेंद्र रहांगडाले, डुलीचंद रहांगडाले, सुभाष ठाकरे, सुखचंद पटले, देवा रहांगडाले, राजू रहांगडाले, दिनेश चौरावार, नीलेश जिवतोडे, छबीलाल राऊत, विनित रीनायते, निसर्ग पिकलमुंडे, शुभम कटकवार, कृष्णा कापगते, प्रज्वल लांजेवार, संदीप कटकवार, चेतन बुधे, अनुज मलेवार, शुभम मिश्रा, धामदेव वनवे, शुभम पारधी, पियुष फूलबांधे, युवती प्रमुख पेजल भुरे, निकिता मेश्राम व कल्याणी मते यांनी परिश्रम घेतले.








