रामटेक :- रामटेक पोलीस स्टेशन आणि उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय, रामटेक यांनी दिनांक ३१/०१/२०२६ रोजी गुप्तवातमीदाराच्या माहीतीवरून खिंडसी पुलासमोर मारूती सुझुकी कार क्र. एम एच ३१/सी पी ६५११ हे वाहन अवैधरित्या ०५ जनावरे (०२ गाई, ०३ कालवड) अशा गोवंश जनावरांची वाहतुक करतांना पकडले. नमुद प्रकरणी चालक आणि त्याचा साथीदार आरोपीतांविरूध्द कलम ११(१) (ड) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम, सहकलम ९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सहकलम ३२५ भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नमुद वाहन चालक हा वाहन सोडुन पळुन गेला होता. परंतु चालकाचा साथीदार शेख राशीद शेख जावेद, वय २५ वर्ष, रा. जुनी खलाशी लाईन, कामठी याला पोलीसांनी शिताफिने ताब्यात घेवुन अटक केले होते. आज रोजी रामटेक पोलीसांनी गुप्तबातमीदाराच्या माहीतीवरून आज दिनांक ०१/०२/२०२६ रोजी अवघ्या २४ तासाच्या आत पाहीजे वाहन चालक आरोपी नामे सलमान फिरोज खान, वय ३० वर्षे, रा. कामठी याला कामठी परीसरातुन ताब्यात घेतले असुन आरोपी अटक प्रक्रीया सुरू आहे.








