spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या देशी दारू बाळगुन विक्री करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

नरखेड :- पोलीस स्टेशन नरखेड येथे दिनांक ०१/०२/२०२६ रोजी नरखेड पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, मनोहर गजभिये नावाचा इसम आपले राहते घरी अवैधरीत्या देशी दारू बाळगुन विक्री करीत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे नरखेड पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन धाड टाकली असता आरोपी नामे मनोहर भिमराव गजभिये, वय ४३ वर्ष, रा. खरसोली, ता. नरखेड, जि. नागपूर याच्या राहत्या घराची दारूबाबत पंचासमक्ष घरझडती घेतली असता देशी दारू मिळुन आली. आरोपीस देशी दारू बाळगणे/विक्री करणेबाबत परवाना विचारला असता कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.

पोलीसांनी पंचासमक्ष १) देशी दारूच्या ७३ निपा किंमती २९२०/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे. नमुद प्रकरणी आरोपी विरूध्दमहाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Popular Articles