spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ग्रामीण विकास विद्यालयाचा मोहित राज्यात प्रथम

कन्हान :- राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२५ –२६ मध्ये प्राथमिक विद्यार्थी (इयत्ता ६ ते ८) गटात ग्रामीण विकास विद्यालयाच्या मोहित महेश राऊत याने प्रथम पारितोषिक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

मोहितने सादर केलेले “स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट फॉर पब्लिक प्लेसेस” हे अभिनव व समाजोपयोगी मॉडेल सार्वजनिक ठिकाणी होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. रेल्वे स्थानके,बस स्थानके, शाळा, रुग्णालये, बाजारपेठा आदी ठिकाणी पाण्याचा योग्य वापर व्हावा, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या मॉडेलमध्ये सेन्सर-आधारित नियंत्रण प्रणाली, पाण्याचा वापर मोजणारे यंत्र, स्वयंचलित बंद -चालु यंत्रणा, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर तसेच गळती ओळखणारी व्यवस्था यांचा समावेश आहे. कमी खर्चात अधिक परिणामकारक ठरणारे हे मॉडेल असल्याचे परिक्षकांनी नमुद केले. या उल्लेखनीय यशामागे लक्ष्मीकांत बांते, मयुर भोंबे आणि प्रदीप घोरमाडे यांचे शास्त्रीय मार्गदर्शन लाभले. मॉडेल डिझाइन, सादरीकरण आणि संकल्पना स्पष्टतेसाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केल्याने मोहितच्या कल्पनेला व्यावहारिक व शाश्वत स्वरूप प्राप्त झाले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमोल गारुडी आणि सचिव विजय कठाळकर यांनी मोहित व त्याच्या मार्गदर्शकांचे अभि नंदन केले. विद्यार्थ्यां मध्ये संशोधनवृत्ती, पर्यावरण-जाणीव आणि सामाजिक जबाबदारी निर्माण करणारी ही कामगिरी अभिमाना स्पद असल्याचे त्यांनी सांगि तले. मोहितच्या यशामुळे ग्रामीण विकास विद्यालयाचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले असुन भविष्यात विद्यार्थी अशाच नवोन्मेषी उपक्रमांतुन राष्ट्रीय पातळीवरही चमकतील असा विश्वास शाळा परिवाराने व्यक्त केला आहे.

Popular Articles