spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सट्टापट्टी चालविणाऱ्या आरोपीतांविरूद्ध गुन्हा नोंद

एमआयडीसी बोरी :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, एमआयडीसी बोरी हद्दीतील एमआयडीसी पार्किंग जवळ, गेट नं. ५ परिसरात सार्वजनिक ठिकाणी अवैधरीत्या एक इसम लोकांकडुन पैसे घेवुन सट्टाप‌ट्टीचे आकडे लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पथक हे घटनास्थळी पोहचले असता एमआयडीसी बोरी हद्दीतील एमआयडीसी पार्किंग जवळ, गेट नं. ५ परिसरात आरोपी कं १) विरेंद्र भावेश डोंगरे, वय २१ वर्ष, रा. टाकळघाट, ता., हिंगणा, जि. नागपूर याला हा कागदावर आकडे लिहुन सट्टाप‌ट्टी चालवित असतांना मिळुन आला. मिळुन आलेल्या आरोपीला अधिक विचारपुस केली असता सदर सट्टाप‌ट्टी आरोपी २) आरोपी अविनाश सोनवने, रा. टाकळघाट, ता. हिंगणा याचे सांगण्यावरून चालवित असल्याबाबत माहीती प्राप्त झाली. पोलीसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम २१००/- रूपये, सट्टापट्टीचे साहीत्य असा एकुण २१०५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपी कं १) विरेंद्र भावेश डोंगरे, वय २१ वर्ष, रा. टाकळघाट, ता., हिंगणा, जि. नागपूर २) अविनाश सोनवने, रा. टाकळघाट, ता. हिंगणा यांच्या विरूद्ध कलम १२ अ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Popular Articles