spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महापालिका निवडणूकीवर उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा तपशील सादर करावयाच्या सूचना

नागपूर :- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांनी अधिनियमातील तरतुदींनुसार निवडणुकीवर केलेल्या खर्चाचा हिशेब राज्य निवडणूक आयोगाने विहित केलेल्या वेळेत व रीतीने सादर करणे अनिवार्य आहे.संबधित उमेदवांरांनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगतच्या 30 दिवसांच्या आत विहित नमुण्यात खर्चाची देयक ,पावत्या ,व्हाऊचर्स इत्यादींच्या स्वसांक्षाकित झेरॉक्स प्रतीसह सादर करणे बंधनकारक आहे.

नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकी चा निकाल जाहीर झाल्यानंतर लगतच्या 30 दिवसात निवडणुकीवर केलेल्या खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक असतांना आजतागायत बऱ्याच उमेदवारांनी विहित वेळेत व रीतीने खर्च सादर केलेला नाही. उमेदवारांनी विहित वेळेत खर्च संनियंत्रण पथकाकडे खर्च सादर करण्यात कसूर केल्यास तर तो पाच वर्षाच्या कालावधीकरीता निवडणुक लढविण्यास अनर्ह? ठरतो.

त्यामुळे ज्या उमेदवारांनी नमुना क्रमांक 1 ते 3 मध्ये खर्च सादर केलेला नसेल त्यांनी मुदतीपूर्वी म्हणजे दिनांक 16 फरवरी 2026 पूर्वी त्वरीत निवडणूक खर्च संबंधित झोननिहाय नियुक्त खर्च संनियत्रंण पथकाकडे सादर करावा ,असे प्रमुख लेख व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी सदाशिव शेळके यांनी कळविले आहे.

Popular Articles