spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाचा डॉ. रामजी आडकेकर यांच्याकडून आढावा

यवतमाळ :- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यांमध्ये १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे विशेष कार्य अधिकारी तथा सहायक संचालक डॉ. रामजी आडकेकर यांनी जिल्ह्याला भेट दिली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी कैलास जवंजाळ, जिल्हा सिकलसेल समन्वयक गजेंद्र कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते.

डॉ. आडकेकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, हिवरी येथे भेट देऊन अरुणोदय सिकलसेल कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सिकलसेल रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याबाबत त्यांनी आवश्यक सूचना दिल्या. तसेच ० ते ४० वयोगटातील अद्याप तपासणी न झालेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी त्यांनी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, मनपूर अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या एनसीडी (असंसर्गजन्य आजार) कार्यक्रमाचा आढावा घेतला. कामकाजात आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. नियमित रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यावर भर देण्यात आला.

तसेच समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका यांच्या कामकाजाबाबत चर्चा करून नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यासाठी नियमित क्षेत्रभेटी व प्रभावी कामकाज करण्याच्या सूचना डॉ. आडकेकर यांनी दिल्या.

Popular Articles