spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

केंद्रीय अर्थसंकल्पावर युवकांना लेखन, संवादाची संधी!

– माय भारत बजेट क्वेस्ट 2026’ चे आयोजन

– माय भारत पोर्टलवर 17 फेब्रुवारीपर्यंत नोंदणीची मुदत

यवतमाळ :- केंद्रीय अर्थसंकल्प 2026 बाबत युवकांमध्ये जागरूकता व समज विकसित करण्याच्या उद्देशाने मेरा युवा भारत कार्यालयाच्या वतीने ‘माय भारत बजेट क्वेस्ट 2026’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम प्रश्नमंजुषा स्पर्धा व नोंदणी मोहिमेचा भाग असून, तो बहु-स्तरीय आणि सहभागी स्वरूपात राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन क्विझ स्पर्धा घेण्यात येणार असून, ही स्पर्धा 17 फेब्रुवारीपर्यंत आयोजित केली जाणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक युवकांनी माय भारत पोर्टल ला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. क्विझ टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश स्तरावरील निबंध लेखन टप्प्यासाठी केली जाईल. या टप्प्यात सहभागी युवकांना केंद्रीय अर्थसंकल्प 2026 च्या प्रमुख विषयांवर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात, राज्य व केंद्रशासित प्रदेश स्तरावर निवड झालेल्या युवकांना धोरणकर्ते व मान्यवरांशी आभासी संवाद साधण्याची संधी दिली जाणार आहे. यामुळे युवकांची धोरणांविषयीची समज, जागरूकता व सहभाग अधिक बळकट होणार आहे.माय भारत बजेट क्वेस्ट 2026 हा युवकांना केंद्रीय अर्थसंकल्पाशी जोडणारा एक अर्थपूर्ण उपक्रम असून, यामुळे युवकांना धोरणनिर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यास व त्यात सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे.या मोहिमेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत, यवतमाळ यांनी केले आहे.

युवकांनी 17 फेब्रुवारीपर्यंत माय भारत पोर्टलवर नोंदणी करून मोठ्या संख्येने क्विझमध्ये सहभाग नोंदवावा, असेही कळविण्यात आले आहे.

Popular Articles