spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजे फाउंडेशन तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप

कन्हान :- येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्या लयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानिमित्त शाळेच्या वतीने राजे फाउंडेशनला निमंत्रण देण्यात आले होते. त्या अनुषंगाने राजे फाउंडेशनच्या माध्यमातुन विद्या र्थ्यांना कार्डबोर्ड, पेन-पेन्सिलसह संपुर्ण शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम राजे फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कन्हान नगरपरिषदेचे नगरसेवक केतन भिवगडे यांच्या पुढाकारातुन राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस हातभार लागावा, तसेच पुढील अभ्यासासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन नितेश तपासे लेखापाल, कन्हान नगरपरिषद, पवार लेखाविभाग, कन्हान नगर परिषद, डॉ. अतुल बर्वे, नगरसेविका पूनम आशिष राठी तसेच नगरसुधार समितीच्या अध्यक्षा छाया नाईक उपस्थित होत्या.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व पटवुन दिले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्या लयाचे मुख्याध्यापक प्रविण साबरे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. शैक्षणिक किट मिळा ल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन येत होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळुन पुढील शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Popular Articles