spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

१९ वर्षांखालील टीम इंडियाचा विश्वविजय देशासाठी अभिमानास्पद – आ. संदीप जोशी

नागपूर :- १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंडवर १०० धावांनी शानदार विजय मिळवत भारताने सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावणे ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. आपल्या तरुण खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, शिस्त आणि संघभावना ही देशातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. या विजयामुळे भारताचे क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल भविष्य अधिक बळकट होणार असून आगामी काळात हेच खेळाडू देशाचे नाव जागतिक स्तरावर अधिक उंचावतील, असा विश्वास आहे. संपूर्ण संघ, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Popular Articles