खापा, वार्ताहर :- नविन वस्ती खापा प्रभाग आठ मधील शिक्षक कॉलनी येथे गेले अनेक दिवसापासून पथदिवे बंद होते. पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारात जाणे येणे करावे लागत होते. तसेच लहान मुलांना खेळायला सुद्धा अडचण होत होती. स्थानिक नागरिकांना रात्रीच जेवण झाल्यानंतर परिवारासोबत फेरपटका करणेही शक्य नव्हते, या समस्येला अनुसरून स्थानिक नागरिक पवन क्षीरसागर यांनी नगरसेवक निखिल आष्ट्णकर यांना तक्रार केली. परंतु न. प. मध्ये निधीची कमतरता असल्याने ही कामे करण्यास त्रासदी होत आहे. तरीही प्रभागातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव घेत, नगरसेवक आष्टणकर यांनी तत्काळ स्वखर्चाने लाईट विकत घेऊन तिथे लाईट लावून दिले. आणि समस्येचे समाधान काढले. कामाची तळमळ आणि आपल्या मतदार राज्याला होणाऱ्या गैरसोयीचे तत्काळ निराकरण करण्याचे हे कौशल्य बघून स्थानिक नागरिकांकडून आष्टनकर यांचे कौतुक करण्यात येत आहे.
प्रभाग आठच्या नगरसेवकाने स्वखर्चातुन लावले पथदिवे, समस्येचे केले तत्काळ निराकरण, नागरिकांची कौतुकाची थाप









