spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपा विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा जागर ‘कारनामा २०२६’

– चिटणवीस सेंटरमध्ये घडला प्रतिभेचा आविष्कार!

– आकांक्षा फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम : विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला मिळालं हक्काचं व्यासपीठ

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना आणि सृजनशीलतेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, आकांक्षा फाउंडेशन तर्फे सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे ‘कारनामा २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचा आविष्कार घडविला.

मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी ‘कारनामा २०२६’ ला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी स्वतः काही प्रयोगांची प्रात्यक्षिके करून पाहिली आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. यावेळी आकांक्षा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ तनेजा, संचालक सोमसूर्व चॅटर्जी, ‘परसिस्टंट’च्या सुवर्णा देशपांडे, अंजू रॉटीया, कॅरालाईन नागर, रेनोव्हेटिओ फाउंडेशनचे नुकुल अग्रवाल, शिक्षक, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका आणि आकांक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात सात इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवल्या जातात. चिटणवीस सेंटर येथे ‘कारनामा २०२६’ या स्पर्धेत ध्येय गाठा, प्रगती करा आणि शिखरावर पोहोचा’ या ब्रीदवाक्याला अनुसरून पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आणि गणितीय कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी ‘टिंगर लॅब मिमोसा’ आणि ‘रेस-द-मॅथ’ या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वयोगटानुसार अर्जुन (लहान गट), नीम (कनिष्ठ गट) आणि अशोका (वरिष्ठ गट) अशा गटांमध्ये या स्पर्धा पार पडल्या. भाषिक कौशल्यासाठी ‘वर्ड-ए-थॉन’ आणि ‘एक्स्टेंपोर’ (उत्स्फूर्त भाषण), तर बुद्धिमत्तेच्या कसौटीसाठी ‘ब्रेन फ्रीझ’ या स्पर्धांनी सर्वांचे लक्ष वेधले. ‘आर्ट-प्ले’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे आणि चित्रांचे भव्य प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आले होते. या उपक्रमात मनपा शाळांसह एमएसबी वर्धमाननगर, मॉडर्न स्कूल, जैन इंटरनॅशनल, एसआय कॉन्व्हेंट, सेंट जोसेफ आणि टॉप टोट्स या शाळांनीही सहभाग घेतला. नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठी गर्दी केली.

Popular Articles