किशोर साहू, मौदा, ता.८:- दरवर्षीप्रमाणे यंदाही परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर, शाखा कोदामेंढी तर्फे उद्या रविवार दिनांक 8 फरवरी पासून दोन दिवसीय मानवधर्माचे भव्य सेवक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ला सकाळी दहा वाजता पासून ग्राम स्वच्छता अभियानाने या भव्य सेवक संमेलनाची सुरुवात होणार आहे. रात्री सात वाजता कुही तालुक्यातील सिल्ली येथील परमात्मा एक भजन मंडळ शाहीर रामाजी भिवगडे व संच यांचा भजनाच्या कार्यक्रम.
सोमवार 9 फेब्रुवारीला सकाळी सात ते आठ वाजता मार्गदर्शक दुर्योधन सरोदे यांच्या निवासस्थानी हवन कार्य, सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत हवन कार्य स्थळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत मानव धर्माची शोभायात्रा. दुपारी साडेबारा ते एक वाजता ग्रामपंचायतच्या भव्य पटांगणावर दीप प्रज्वलन व सेवक संमेलनाचे उद्घाटन,भगवान बाबा हनुमानजी ,महानत्यागी बाबा जुमदेवजी, मातोश्री वाराणसीआई यांच्या प्रतिमेचे पूजन व पाहुण्यांचे स्वागत ,दुपारी एक ते साडेचार वाजता मानवधर्म शिकवणी व परिसंवाद चर्चासत्र ,सायंकाळी साडेचार वाजेपासून स्नेहभोजन, रात्री सात वाजता साकोली तालुक्यातील मुक्काम बोदरा (पिंडकेपार)येथील मातोश्री कला मंच गायक अमर दिघोरे यांच्या मानवधर्म जागरण कार्यक्रम.
संमेलनाचे उद्घाटन मंडळाचे संचालक तांपेश्वर वैद्य करणार असून अध्यक्षस्थानी मंडळाचे सचिव किरण राऊत राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने ,उपाध्यक्ष देवराम तुमसरे, सहसचिव प्रदीपकुमार चौधरी, कोषाध्यक्ष सुभाष दहेकर सह गावातील, परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील समस्त मंडळाचे सर्व पदाधिकारी, संचालक ,मार्गदर्शक व कार्यकर्ता गण उपस्थित राहणार असून या सेवक संमेलनाच्या सर्व सेवक सेविकांनी, दुखी कष्टी मानवांनी व निमंत्रित पाहुण्यांनी उपस्थित राहून परमेश्वरी कृपेच्या लाभ घेण्याचे आव्हान संमेलनाचे आयोजक शाखा कोदामेंढी मंडळाचे मार्गदर्शक दुर्योधन सरोदेसह समस्त सेवक सेविका यांनी केले आहे.








