spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पवित्र दीक्षाभूमीवर त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती संपन्न

नागपूर :- पवित्र दीक्षाभूमीवर शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे उपस्थित होते. या कार्यक्रमाला भिक्खू संघरत्न मानके जापान, भिक्खू धम्मशिखर आणि जापान मलेशिया व थायलंडचे भिक्खू शोजेन अरही जापान भिक्खू शोताई योकोयामा भिक्खू ज्योक्याव ओनो, भिक्खूणी थिऊ ओची, डॉ. भिक्खू नंदरतन, सारनाथ भिख्खू विनय, डॉ. भिक्खू संम्यक बोधी, भिक्खू अशोक बोधी, भिक्खु जिवक, इत्यादी भिक्खू भिक्खूणी उपस्थित होत्या. सर्वप्रथम दीक्षाभूमीवरील प.पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर जापान, मलेशिया, थायलंड आणि भारतीय भिक्खू संघाने स्तूपाचे आत जापानी शैलीत बुद्ध वंदना आणि सुत्तपठन केले. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक -उपासिका उपस्थित होत्या. त्यानंतर बोधी वृक्षाखाली त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी बोलतांना संघरत्न मानके म्हणाले की, माता रमाईच्या त्यागा मुळे आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारखे व्यक्तिमत्व मिळून आमचा उद्धार झाला. भिक्खू विनय यांनी माता रमाई यांचे जीवन त्याग, बलिदान आणि धैर्याचे प्रतीक आहे. असे सांगितले. डॉ. भिक्खू संम्यक बोधी यांनी रमाई म्हणजे मनाला अंतर्मुख आणि उन्नत करणारा अश्रूंचा लावण्य सोहळा रमाई ही आपली संस्कृतीक महामाता असे सांगितले. यावेळी बोलतांना विलास गजघाटे यांनी सांगितले की, पवित्र दिक्षाभुमीवर सर्व धार्मिक कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात येतील. नागपुरातील सर्व बौद्ध उपासकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन विलास गजघाटे यांनी केले. यावेळी बौद्ध उपासक प्रभाकर दुपारे, देवाजी रंगारी, शरद मेश्राम, अशोक शेंद्रे, विठ्ठल ढोगळें, विशाल शुक्ला, संजीव मोरे, राजू जनबंधू, अशोक हाडके, सुनील भोसले, मिलिंद थुल लता डांगे, मंगला खोब्रागडे, रेखा भोसले, सुषमा शेंडे, माया जामगडे, कविता रामटेके, यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद मेश्राम आणि आभार सुनील भोसले यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.