खापा, वार्ताहर :- विविध व्यंजनाचे स्टॉल साकारून जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा, नागलवाडी येथे (दि. ६) शुक्रवारला आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्यात चौदा प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते. यात फळे, बेकरी व्यंजन, तरल खाद्य पदार्थ इ. पाककृतीचा समावेश होता. मेळाव्यात चार हजार रुपये पेक्षा अधिकची उलाढाल झाली असून या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आर्थिक साक्षरतेचे घडे अभ्यासले. शंभर पेक्षा अधिक माता, बचत गटाच्या महिलांनी सहभाग घेऊन चटपटीत व्यंजनाचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी चंद्रशेखर टेकाम शाळा व्यवस्थापन समिती, प्रमूख अतिथी म्हणून सरपंच दिपाली ठाकरे, ग्रामविकास अधिकारी एस. एन. डाबरे, पोलिस पाटील राहूल करणाके, विविध समितीचे पदाधिकारी संजय गिरमेकर, लक्ष्मण आहाके, मेघा क्षीरसागर, संगिता बांगडे, आकांक्षा मोरघरे, अनू सार्वे, किरण धूर्वे, अंजली बघेले, अंगणवाडी सेविका कंचना मरकाम, शिवानी ऊईके, दर्शना भलावी, अंगणवाडी मदतनिस राधा भलावी, गणेश सराटे, अंकूश भलावी, विनोद पंधरे यांची उपस्थिती होती. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रभू कारोकार यांनी मोलाची भूमिका बजावली.




