spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लाखनी परिसरात अवैध रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज,प्रतिनिधी भंडारा लाखनी दि. १० :- भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध रेती तस्करीविरुद्ध धडक मोहीम राबवत एका ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे. लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत रामपूरी शिवारात ही कारवाई करण्यात आली असून, एकूण ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुरमाडी तूप ते नान्होरी रोडवर विना परवाना रेतीची अवैध वाहतूक सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या परिसरात सापळा रचून धाड टाकली असता, एक निळ्या रंगाचा विना क्रमांकाचा ‘स्वराज ७३५’ ट्रॅक्टर रेतीची वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी ट्रॅक्टरसह १ ब्रास रेती असा एकूण ८,०६,००० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

याप्रकरणी ट्रॅक्टर चालक श्रीमंत पिसाराम मरस्काल्हे (२५, रा. मोगरा) आणि ट्रॅक्टर मालक हरिचंद्र रुशी गिलोरकर (५७, रा. मुरमाडी/तूप) यांच्याविरुद्ध लाखनी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ४९ अन्वये गुन्हा (क्र. ४६/२०२५) दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ठवकर व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहेत.

Popular Articles